Sharad Pandhare

Writer, Poet, English Teacher, Lecturer, Teacher Educator, Member Board of Studies Maharashtra State, Master Trainer and Mentor RMSA and British Council.

Monday, September 9, 2019



शरद पांढरे यांना 'राज्य उत्कृष्ट शिक्षक  (नेत्रदीपक) पुरस्कार'
आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासना मार्फत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निष्ठेने काम करणाऱ्या राज्यातील पाच उत्कृष्ठ शिक्षकांचा 'राज्य उत्कृष्ट शिक्षक  (नेत्रदीपक) पुरस्कार' देऊन सन्मान करण्यात आला. ९ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित भव्यदिव्य कार्यक्रमात  शरद पांढरे सर यांना पुरस्काराचे वितरण डॉ. अशोकजी उईके, मंत्री आदिवासी विकास, डॉ. परिणयजी फुके राज्यमंत्री आदिवासी विकास, श्रीमती. मनिषा वर्मा, प्रधान सचिव आदिवासी विकास यांचे हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
 डॉ किरण कुलकर्णी आयुक्त, सुबराव शिंदे उपसचिव, सुनील पाटील उपसचिव, संजय मीणा अपर आयुक्त ठाणे, दशरथ पानमंद सह आयुक्त, लोमेश सलामे उपायुक्त आदि. प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

    विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेले असून श्री. शरद  पांढरे सर हे इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट शिक्षक, कवी, शिक्षणतज्ज्ञ म्हणून सुपरिचित आहेत. राज्य अभ्यास मंडळ सदस्य तथा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक निमिर्ती मंडळ सदस्य (बालभारती) म्हणून इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकांच्या इ.६वी ते १०वी च्या प्रथम व तृतीय भाषेच्या पाठ्यपुस्तकांचे लेखन गटात पांढरे सरांचा सहभाग आहे. तसेच राज्यस्तरीय, विभाग, जिल्हा, तालुकास्तरीय प्रशिक्षणांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून हजारो शिक्षकांना व विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम करतात. SSC विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन, हाऊस सिस्टम, लँग्वेज लर्निंग लॅब, उपचारात्मक अध्यापन, आश्रमशाळेत लोकसहभागातून पहिला डिजिटल क्लासरूम व स्मार्ट क्लासरूम उभारण्यात महत्वाची भूमिका पार पाडली.
 CSRच्या माध्यमातून वसतिगृह, विविध शैक्षणिक साहित्य मिळविणे व उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न. किशोरवयीन मार्गदर्शन, करिअर गाईडन्स व व्यक्तिमत्व विकास, स्कील डेव्हलपमेंटसाठीचे वर्कशॉपचे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आयोजन केले
       ज्ञानरचनावाद, कृतीयुक्त शिक्षण, इ-लर्निंग व तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर, विविध शैक्षणिक दालनांची निर्मिती, शाळेला ISO मानांकन, स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी मिळविण्यासाठी समन्वयक म्हणून काम केले. मुख्याध्यापकांना, सहकाऱ्यांना सहकार्य व प्रेरणा, पालकांना सतत प्रेरणा व मार्गदर्शन केले. सहकारी व विद्यार्थ्यांच्या मदतीने शेणवे येथे सुंदर बाग व सजावट करून स्कुल इकोसिस्टीम निर्माण  केली.
        पांढरे सरांनी शैक्षणिक ब्लॉगची निर्मिती, काव्यलेखन, यू ट्यूब चॅनेल इ. द्वारे लेखन करतात.
 पांढरे सर जाणीव प्रतिष्ठान शहापूर या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे सदस्य असून त्यामाध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचे कार्य करतात.
 या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य शासनाने शरद पांढरे सर यांना 'राज्य उत्कृष्ट शिक्षक  (नेत्रदीपक) पुरस्कार' देऊन गौरव केला.

        विशेष बाब म्हणजे कायापालट अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आश्रमशाळांमध्ये ISO मानांकन प्राप्त शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा शेणवे, ता. शहापूर, जि. ठाणे या शाळेचा देखील गौरव करण्यात आला











https://youtu.be/Wbo42wMjDmY
*पहायला विसरू नका*
आपले लोकप्रिय चॅनेल
*शिवमार्ग live*




https://youtu.be/zVfPduU1Nno
अवश्य पहा,लोक हिंद
Smp केबल चॅनेल न 809




https://www.facebook.com/416022822518075/posts/498455287608161/